प्रतिकारक प्रणालीच्या महत्त्वपूर्ण घटकांना अक्षम करण्यासाठी कोरोना विषाणू ज्या प्रोटीनचा वापर करतो, त्याला रोखण्याची पद्धत वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. या नव्या पद्धतीमुळे नवे औषध निर्माण करणे सोपे ठरणार असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या सेंटर एंटोनिया येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास हेल्थ सायन्स सेंटरच्या संशोधकांनी दोन मॉलिक्यूल विकसित केले आहेत. हे मॉलिक्यूल सार्स-सीओवी-2 पीएलप्रोकडून वापरला जाणारा मॉलिक्यूल ‘सीजर’ एंजाइमला रोखण्याचे काम करतात.
जर्नल सायन्समध्ये प्रकाशित अध्ययनानुसार सार्स-सीओवी-2-पीएलप्रो मानवी प्रोटीनला प्रक्रियाकृत करून संक्रमण वाढविण्याचे काम करतो. हे एंजाइम दोन प्रकारच्या समस्या निर्माण करते. हे विषाणूसाठी जबाबदार प्रोटीनला उत्तेजित करते, याचबरोबर संक्रमणावर हल्ला करण्यासाठी प्रतिकारकशक्तीला संकेत देणाऱया सायटोकिंस आणि केमोकिंस नावाच्या अणूंनाही रोखते, अशी माहिती यूटी हेल्थ सेंट एंटोनियोमधील जैवरसायन आणि स्ट्रक्चरल बायोलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधनाचे वरिष्ठ लेखक शॉन के. ओल्सेन यांनी दिली आहे.
सार्स-सीओव्ही-2-पीएलप्रोला रोखण्यास मोठय़ा प्रमाणात यशस्वी ठरणाऱया अवरोधकांचा विकास वैज्ञानिकांनी घडवून आणला आहे. संशोधकांनी या इंजाइमांची तुलना पूर्वी मिळालेल्या कोरोना विषाणूच्या इंजाइमांशी केली तेव्हा त्यांना स्वतःच्या समकक्षाच्या तुलनेत वेगळय़ा प्रकारे काम करत असल्याचे आढळून आले. या इंजाइमांची समानता आणि अंतर ओळखून कोरोना विषाणूच्या विरोधात अवरोधकांना विकसित केले जाऊ शकते.