प्रतिनिधी/ पणजी
राज्यात कोरोना बळींचा आकडा साडेतीनशे पार गेला असून काल रविवारच्या 9 बळींमुळे कोरोना बळींची संख्या 351 झाली आहे. मागील चार दिवसात कोरोनामुळे 33 बळी गेले आहेत. त्याचबरोबर कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. रविवारी नव्याने 407 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर 537 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सक्रीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 5781 एवढी आहे.
मडगाव, सांखळी आणि पर्वरी हे भाग सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. मडगावाची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 460 वर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ सांखळीची रुग्णसंख्या 440 वर पोहोचली आहे. पर्वरीची रुग्णसंख्या 362 झाली आहे. डिचोलीची रुग्णसंख्या 224 झाली आहे. पेडणेची रुग्णसंख्या 236 झाली आहे. वाळपईची रुग्णसंख्या 259 झाली आहे. म्हापशाची रुग्णसंख्या 250 तर पणजीची स्थिती गंभीर बनत असून रुग्णसंख्या 343 एवढी झाली आहे. हळदोणाची रुग्णसंख्या 143, बेतकीची 134, कांदोळीची 187, कासारवर्णेची 89, कोलवाळची 86 तर खोर्लीची रुग्णसंख्या 161 झाली आहे.
चिंबलची रुग्णसंख्या 234 झाली आहे. शिवोलीची रुग्णसंख्या 157, मयेची 68, कुडचडेची 99, काणकोणची 91 तर वास्कोची रुग्णसंख्या 300 झाली आहे. बाळ्ळीची रुग्णसंख्या 43, कासावलीची 156, चिंचिणीची 35, कुठ्ठाळीची 231, कुडतरीची 42, लोटलीची 121, मडकईची 129, केपेची 11, सांगेची 79, शिरोडय़ाची 34, धारबांदोडय़ाची 118, नावेलीची 61 तर फोंडाची 297 झाली आहे.