सोमवारी 441 जण कोरोनामुक्त, 71 नव्या रुग्णांची भर, 4 जण दगावले
प्रतिनिधी / बेळगाव
बाधितांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱयांची संख्या वाढती आहे. सोमवारी जिह्यातील 71 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर 441 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळातून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे महिलेसह 4 जण दगावले आहेत.
आरोग्य विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी जिह्यात 71 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये बेळगाव शहर उपनगरातील 23 व ग्रामीण भागातील 2 असे तालुक्मयातील 25 जणांचा समावेश आहे. बेळगाव येथील एका महिलेसह सौंदत्ती, हुक्केरी, चिकोडी येथील चार जण दगावले आहेत.
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमधील माहितीनुसार एकूण बाधितांची संख्या 17 हजार 997 वर पोहोचली आहे. यापैकी 15 हजार 804 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली असून 1 हजार 922 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. जिह्यातील मृतांचा सरकारी आकडा 271 वर पोहोचला आहे.
अद्याप 24 हजारांहून अधिक जण 14 दिवसांच्या होम केअरमध्ये आहेत. आतापर्यंत 1 लाख 33 हजार 550 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. 1 लाख 14 हजार 72 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सोमवारी रुग्ण संख्या घटली असून रोज 300 ते 500 च्या घरात असणारा बाधितांचा आकडा 100 आत पोहोचला आहे.
पिरनवाडी, अलतगा, रुक्मिणीनगर, मजगाव, मराठा कॉलनी, ताशिलदार गल्ली, चन्नम्मानगर, अजमनगर, मराठा मंदिरजवळ, टिळकवाडी, वडगाव, नेहरुनगर, कॅम्प, पोलीस हेडक्वॉर्टर्स, बिम्स क्वॉर्टर्स, शाहूनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.