वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱया रक्षक कॉलनी परिसरात एका 58 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रविवारी सकाळी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे हिंडलगासह बेळगाव परिसरात एकच खळबळ माजली असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत स्थानिक रहिवासी व आरोग्य खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रक्षक कॉलनी, विजयनगर परिसरात राहणाऱया एका 58 वर्षीय इसमाला प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने दोन दिवसांपूर्वीच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. पण, त्या ठिकाणच्या वैद्याधिकाऱयांनी संबंधित रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला त्यांच्या नातेवाईकांना दिला. त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच त्यांना जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये दाखल करून उपचार सुरू होते. पण, रविवारी पहाटे त्यांची प्रकृती खालावल्याने सदर रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर लागलीच वैद्याधिकाऱयांनी त्यांच्या स्वॅबचा तपासणीचा अहवाल मागवून घेतला. यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्व नातेवाईकांना धक्काच बसला आहे. शिवाय शनिवारी सदर रुग्णाच्या आईचेही आजाराने निधन झाले आहे. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याशिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 58 वर्षीय व्यक्तीच्या भावाचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
याबाबतची माहिती आरोग्य खात्याकडून हिंडलगा ग्राम पंचायतीच्या अधिकाऱयांना मिळताच प्रकरणाची गंभीर दखल घेत मृत व्यक्ती राहत असलेल्या अपार्टमेंटला सीलडाऊन करण्यात आले. संपूर्ण परिसरात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या सर्व कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.