प्रतिनिधी/ सातारा
येथील कैलास स्मशान भूमी येथे कोरोनाच्या साथीत मृत पावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार व इतर कार्य करणाया सातारा नगरपालिकेच्या कोरोना योद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.स्वामी समर्थ महिला बचत गट व सर्व कचरा वेचक श्रमिक संघ यांच्या वतीने सफाई कर्मचायांना सुरक्षा साधने बुट, मास्क, हातमोजे, सॅनिटाइझर, साबण यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना अध्यक्षा प्रतिभाताई जगताप म्हणाल्या, कोरोना या साथरोगात माणसाला माणसा जवळ जायला भीती वाटत असून या साथीत मृत पावलेल्या रुग्णांवर आपला जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार व इतर कार्य करणाया सफाई कर्मचायांना खरी गरज असण्याचे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे जगदीप शिंदे सूचित केले. त्यांनी सूचित केलेले बचतगटाच्या माध्यमातून कृतीतून आणले तसेच सर्व सफाई कर्मचायांना कोरोना योद्धा म्हणुन सन्मानित करण्यात आले.
नगरपालिकेचे वाहक प्रेमचंद मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास कैलास स्मशान भूमीचे व्यवस्थापक व कर्मचारी नगरपालिका सफाई कर्मचारी व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.