लवकरच बाजारात येण्याची शक्यता, अन्य औषधांचेही संशोधन जोरात
हैदराबाद / वृत्तसंस्था
कोरोना आणि त्याच्या अनुषंगाने उद्भवणाऱया बुरशीजन्य (फंगस) विकारांवर औषधे निर्माण करण्यासाठी संशोधन वेगवान पद्धतीने सुरू आहे. भारतातही अनेक नवी औषधे येऊ घातली आहेत. हैदराबाद आयआयटीच्या संशोधकांनी तोंडाने घेता येणाऱया अँफोटेरायसिन बी च्या गोळय़ा तयार केल्या आहेत. त्यांच्यावर परीक्षणे सुरू असून त्या लवकरच रुग्णांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे औषध ब्लॅक फंगस या विकारावर रामबाण उपाय आहे.
त्याचप्रमाणे अमेरिकेतील पेन्सिलव्हानिया विद्यापीठाच्या संशोधकांनी ‘डायाब्झी’ या औषधाच्या चाचण्या सुरू केल्या असून हे औषध शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अतियश उपयुत्क असल्याचे आढळून आले आहे. या औषधाची माहिती ‘सायन्स इम्युनॉलॉजी’ या नियतकालिकात याची माहिती आहे. या औषधाने सार्स प्रकारच्या कोणत्याही कोरोना विषाणूची वाढ रोखली जाते. तसेच तो निष्प्रभ करता येतो. अद्याप याला अमेरिकेच्या औषध नियंत्रण विभागाची मान्यता मिळालेली नाही. तथापि, ती लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
घेण्यात सुलभता
हैदराबाद आयआयटीच्या संशोधकांनी सूक्ष्मतंतू तंत्रज्ञानाच्या आधारावर अँफोटेरायसीन बी औषधाच्या तोंडावाटे घेता येणाऱया गोळय़ा बनविल्या असून त्या प्रभावी असल्याचे प्राथमिक चाचण्यांमध्ये स्पष्ट झाले. इंजक्शन घेण्यापेक्षा या गोळय़ा घेणे सुलभ आहे. त्यामुळे त्या लवकर उपलब्ध झाल्यास ब्लॅक फंगस रुग्णांना मोठाच दिलासा मिळेल. 2019 मध्ये या औषधाच्या चाचण्या ‘काळय़ा तापा’वर उपयुक्त ठरल्या होत्या. आता याच औषधामध्ये काही परिवर्तन करून ब्लॅक फंगस औषध तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
या नव्या गोळय़ांमधील औषधी द्रव्य पोटात गेल्यानंतर रक्तात त्वरित मिसळते. ते ब्लॅक फंगसच्या विषाणूंचा नाश घडविते. मात्र, शरिराच्या मूळच्या रोगप्रतिकारक शक्तीची हानी यामुळे होत नाही, असा दावा करण्यात आला.