छोटय़ा आयोजनांमध्ये कोरोनाचा धोका : परिचिताला भेटतानाही खबरदारी बाळगा : मुलांच्या हालचालींवर नजर
कोरोना विषाणू कधीपर्यंत राहणार हे आताच कुणालाही सांगता येणार नाही. परंतु प्रारंभिक काळात कोरोनासंबंधी खबरदारी बाळगणारे लोक आता निष्काळजी झाले आहेत. तर महिन्यांपासून अनिश्चिततेत राहिलेल्या छोटय़ा मुलांची कुटुंबे आता सामान्य होण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आता बाहेर पडून लोकांना भेटण्यास प्रारंभ करू लागले आहेत. काही कुटुंबे अशा कार्यक्रमांमध्ये सामील होऊ लागली आहेत, जे काही काळापूर्वीपर्यंत धोकादायक मानले जात होते असे अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱयांना आढळून आले आहे.
तज्ञांचा इशारा
देशात वाढत असलेल्या रुग्णांप्रकरणी छोटय़ा आयोजनाची किती भूमिका आहे याची माहिती सद्यकाळात आरोग्य अधिकाऱयांकडे नाही. परंतु अमेरिकेच्या शिकागो, लॉस एंजिलिस, मेरीलँड, मिशीगन यासारख्या काही शहरांमध्ये या दोन्ही गोष्टी परस्परांशी निगडित असल्याची बाब समोर येऊ लागली आहे. जर तुम्ही तुमचे जवळचे मित्र, नातलग आणि अन्य लोकांच्या नजीक राहत असल्यास तुम्हाला सावध राहण्याची गरज असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. आम्ही कुटुंबीयांसोबत एकत्र आल्यास संसर्ग फैलावण्याचा धोका सार्वजनिक ठिकाणांइतका नसल्याची धारणा तयार झाली आहे. परंतु प्रत्यक्षात अशी स्थिती नसल्याचे मिनेसोटाचे आरोग्य आयुक्त जॅन माल्कम यांनी म्हटले आहे.
कशाप्रकारे सुरक्षित सहभागी व्हाल?
काहीसे विचित्र वाटेल, परंतु छोटय़ा आणि अनौपचारिक आयोजनांच्या तुलनेत मोठे आणि औपचारिक आयोजन सर्वसाधारपणे सुरक्षित असते, कारण मोठय़ा कार्यक्रमांमध्ये लोकांना जोखीम कमी करण्यासाठी नियमांचे पालन करावे लागते असे उद्गार शिकागो आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉक्टर एलिसन एर्वाडी यांनी काढले आहेत. अलिकडेच आलेल्या प्रकरणांमध्ये 5-6 टक्के अशी प्रकरणे असतील, जी गर्दी असलेल्या ठिकाणाशी तसेच मोठय़ा कार्यालयांशी संबंधित आहेत. अनेक शहरांमध्ये अनेक ठिकाणी समर कॅम्प देखील आयोजित झाले, परंतु कठोर नियमांमुळे ठराविकच मुले आजारी पडल्याचे एलिसन यांनी सांगितले आहे.
कुटुंबासोबत असतानाही खबरदारी घ्या
मित्र आणि कुटुंबीयांसोबत असताना सर्वजण निवांत होतात आणि मास्क हटवतात. याचबरोबर मुलांच्या सोशल डिस्टन्सिंगवरूनही लक्ष दिले जात नाही. जेथे लोकांना सुरक्षित वाटते, प्रत्यक्षात तेथेच अनेक दृष्टय़ा जोखीम अधिक असते असे डॉक्टर एलिसन यांनी म्हटले आहे. याचा अर्थ कुटुंबांनी स्वतःच्या घरात वर्षभर बंद करून घ्यावे असा होत नाही. सार्वजनिक आरोग्याच्या सूचनांचे पालन करण्याची गरज असल्याचे एएपीच्या साथरोगविषयक समितीचे उपाध्यक्ष आणि पीडियाट्रिशियन डॉक्टर शॉन ओ लेरी यांनी म्हटले आहे.
शक्य असल्यास सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन बाहेरच केले जावे आणि सर्वानी मास्क परिधान केल्याचे निश्चित करावे. विशेषकरून 6 फुटांचे अंतर राखणे शक्य नसलेल्या ठिकाणी मास्क आवश्यक असल्याचे लेरी यांनी म्हटले आहे. अशा ठिकाणी राहणे क्रमप्राप्त असल्यास सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनकडून घरात व्हेंटिलेशन वाढविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुलांनी इतरांना भेटणे गरजेचे आहे. भावनात्मक विकास आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मुलांना मिळाव्यात परंतु सुरक्षित पद्धतीने, असे डॉक्टर एलिसन यांनी म्हटले आहे.
बाधित मुलाचा शोध लावणे आव्हानात्मक
कोविड-19 शी झगडणाऱया अनेक मुलांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. ते जेव्हा आजारी असतात तेव्हा त्यांना लक्षणे कोरोना विषाणूमुळे दिसून येत आहेत की नाही हे सांगणे अवघड असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. दक्षिण कोरियात 91 मुलांवर झालेल्या एका अध्ययनात 42 टक्के पॉझिटिव्ह मुले असिम्पटोमॅटिक असल्याचे दिसून आले हेते. कुटुंबे स्वतःच्या मुलांसोबत एखाद्या कार्यक्रमात सामील झाल्यास त्यांचा मुलगा कोरोना फैलावू शकतो याची जाणीवच नसल्याचे घडू शकते.
फ्रान्स : नवी आकडेवारी नाही
फ्रान्समध्ये शनिवारी 17 हजार नवे रुग्ण सापडले होते. त्यानंतर सरकारने रविवारी आणि सोमवारी नवी आकडेवारी प्रसिद्ध केलेली नाही. पॅरिसच्या उपनगरी भागांमध्ये प्रतिदिन सरासरी 3500 रुग्ण आढळत आहेत. 40 टक्के रुग्ण शाळा आणि विद्यापीठांमधून सापडत असल्याचे सांगण्यात आले.
मेक्सिको : रुग्ण वाढले
मेक्सिकोत सोमवारी नव्या रुग्णांच्या संख्येने सर्वांनाच हैराण केले आहे. तेथे एका दिवसातच 28 हजार 115 नवे रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर दिवसभरात 2,789 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढल्याने काही सार्वजनिक ठिकाणी निर्बंध लावणे गरजेचे ठरल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
दरवाज्याच्या हँडलने फैलावत नाही संसर्ग
कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी लोकांना मास्क आणि हँडग्लोव्हज परिधान करण्याचा सल्ला दिला जात आहे. घराच्या दरवाज्याचे हँडल आणि लिफ्टचे बटण दाबतानाही खबरदारी बाळगण्यास सांगण्यात येत आहे. परंतु कोरोना महामारीच्या या भीतीदरम्यान वैज्ञानिकांनी दिलासाजनक वृत्त दिले आहे.
अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका संशोधनात कोरोना विषाणू पृष्ठभागावरून फैलावत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. संशोधनानुसार पृष्ठभागावर पडलेल्या कुठल्याही विषाणूत मानवाला आजारी करण्याचे बळ नसते.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हात धुणे तसेच स्वतःच्या चेहऱयाला स्पर्श न करण्यापेक्षा आवश्यक पाऊल सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि मास्क वापरण्याची सवय लावून घेणे असल्याचे विधान या संशोधनात सामील प्राध्यापिका मोनिका गांधी यांनी केले आहे. संशोधनानंतर पृष्ठभागावर सातत्याने बॅक्टेरियाप्रतिबंधक स्पेचा मारा करणे अनावश्यक ठरू शकते असेही त्यांनी म्हटले आहे. विषाणू नष्ट करण्यासाठी जगभरात स्प्रेचा मारा केला जात आहे.
कोरोना संक्रमणावरून जगभरात अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. कोरोना विषाणूच्या फैलावाचे मुख्य कारण पृष्ठभाग किंवा डोळय़ांना स्पर्श करणे नाही. कोरोना विषाणू एका माणसाकडून दुसऱया माणसात फैलावत असल्याचे म्हटले जाऊ शकते. अशा स्थितीत सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क परिधान करणे हा एकमात्र उपाय आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कोरोनाबाधित असलेल्या व्यक्तीकडून फैलावत असल्याचे प्राध्यापिका मोनिका यांनी अमेरिकेच्या एका विज्ञानविषयक संकेतस्थळाशी बोलताना म्हटले आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे हानिकारक अनेकांना विविध समस्या
हवामान बदलताच हंगामी आजाराची प्रकरणे वाढू लागली आहेत. देशात फैलावलेल्या कोरोना महामारीमुळे लोकांमध्ये दहशत आहे. याच भीतीमुळे कोविड-19 बाधिताच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये नमूद असलेली औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच घेत आहेत. परंतु औषधांमुळे उलटय़ा होणे, मन अवस्थ होऊ लागल्यावर धावत डॉक्टरांकडे पोहोचू लागले आहेत.
समाजमाध्यमांवर प्रिस्क्रीप्शन प्रसारित
काही लोक समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या प्रिस्कीप्शनवर विश्वास ठेवत आहेत. औषध दुकानांवर व्हिटामिनची टॅबलेट किंवा कॅप्सूल घेण्यासाठी लोक पोहोचत आहेत. प्रत्यक्षात लोक कोरोनापासून वाचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु यामुळे नुकसानच अधिक होत आहे.
यकृतसंबंधी समस्या
सध्या यकृताच्या आजारासंबंधीच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. लोक रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक किंवा ऍलोपथी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाजारात विकले जाणाऱया हर्बल आणि आयुर्वेदिक काढय़ाचे सेवन करत आहेत. यातून यकृतात त्रास होत आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय
लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच व्हिटामिन ई, सी आणि डीच्या गोळय़ा घेऊ लागले आहेत. उलटय़ा होणे किंवा अस्वस्थपणाचा त्रास होणारे अनेक रुग्ण येत आहेत. या रुग्णांनी कोरोनापासून वाचण्यासाठी व्हिटामिनच्या गोळय़ा घेतल्याची माहिती दिली आहे.. कुणाला शेजाऱयाने तर कुणाला नातलगाने ही औषधे घेण्यास सांगितले होते.