ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट होत असली तरी राज्यातील मृतांची वाढती संख्या पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे. मागील 24 तासात 9 हजार 350 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 15,176 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 388 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 56 लाख 69 हजार 179 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.69 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.93 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,84,18,130 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,24,773 (15. 42 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,04,462 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,621 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 38 हजार 361 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- मुंबई : मागील 24 तासात 718 जणांना डिस्चार्ज!
मुंबईत मागील 24 तासात 575 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,17,683 वर पोहचली असून सद्य स्थितीत 15,390 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 15,216 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण दुप्पतीचा काळ 702 दिवस इतका आहे.