- मागील 24 तासात 120 मृत्यू; 7,302 नवे रुग्ण
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या प्रमाणात चढ – उतार होताना दिसत आहे. मागील 24 तासात 7 हजार 302 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 7 हजार 756 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 120 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.34 %
राज्यात आजपर्यंत एकूण 60 लाख 16 हजार 516 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.36 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.09 टक्के एवढा आहे.
- 5.51 लाख व्यक्ती होम क्वारंटाईन
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,62,64,059 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 45 हजार 057 नमुने (13.5%) पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 872 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3,743 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात
राज्यात सद्य स्थितीत 94 हजार 168 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा 15 हजार 869 इतका आहे. पुण्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात हा आकडा 11 हजार 710 इतका आहे. त्यानंतर कोल्हापुरात सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. कोल्हापुरात ही संख्या 10,701 इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या 10 हजार 309 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 159, तर सिंधुदुर्गात हा आकडा 2,270 इतका आहे.