ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतच आहे. मागील 24 तासात 18,056 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 380 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 13 लाख 39 हजार 232 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 35 हजार 571 एवढा आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
रविवारी दिवसभरात 13,565 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 10 लाख 30 हजार 015 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 लाख 73 हजार 228 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 76.91 % आहे. तर मृत्यू दर 2.66 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 65 लाख 65 हजार 649 नमुन्यांपैकी 13 लाख 39 हजार 232 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19 लाख 64 हजार 644 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 30 हजार 467 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- शहरे ॲक्टिव्ह रुग्ण संख्या
- मुंबई : 1,98,846
- ठाणे : 1,82,560
- पुणे : 2,85,534
- नाशिक : 72,926
- नागपूर : 74,825