ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,451 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 30 जणांचा मृतृ झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 52 हजार 253 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 390 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 2,421 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 63 हजार 946 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.7 % आहे. सद्य स्थितीत राज्यात 35 हजार 633 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 51 लाख 08 हजार 645 नमुन्यांपैकी 20 लाख 52 हजार 253 (13.58 %) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 1 लाख 65 हजार 992 क्वारंटाईनमध्ये असून, 1 हजार 852 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.