ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
कर्जबाजारी पाकिस्तानला कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेने 60 लाख डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली आहे. अमेरिकेचे पाकिस्तानमधील राजदूत पॉल जोन्स यांनी एका व्हिडीओ मेसेजमधून याबाबतची माहिती दिली आहे.
जोन्स म्हणाले, ‘अमेरिकेकडून मिळणारा निधी पाकिस्तानला कोरोना रुग्णांची काळजी घेणे, आरोग्य सेविकांना प्रशिक्षण देणे, अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांची खरेदी, सुसज्ज कोरोना टेस्टिंग लॅब उभारणे यासाठी वापरता येईल.’
जोन्स यांनी सर्व पाकिस्तानी जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अमेरिकेला औषधांचा पुरवठा केल्याबद्दल जोन्स यांना पाकिस्तानचे आभार मानले असून, हे दोन्ही देशांमधील मैत्री आणि संबंध दर्शवणारे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या 56 हजार 349 वर पोहचली असून, 1167 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 482 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, 37 हजार 700 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामधील 111 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे