प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना काळात उत्तम काम केलेल्या कोरोना वॉरियर्सचा सन्मान युवकांच्यावतीने करण्यात आला. प्रत्येक रविवारी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करणाऱया शिवभक्तांच्यावतीने हा सन्मान करण्यात आला.
कोरोना काळात रुग्णांची हेळसांड होवू नये, यादृष्टीने बेळगावमधील काही युवकांनी विभागवार नोडल अधिकाऱयांशी संपर्क साधून 150 हून अधिक रुग्णांना ऑक्सीजन बेड उपलब्ध करून दिला. बेळगावसोबतच मांजरी, सांगली, गडहिंग्लज या भागात ही पोहचून सेवा बजावली. त्याच सोबत रुग्णांना ऑक्सीजन पुरविणे, त्यांची जेवणाची व्यवस्था करणे, घरपोच औषधे पोहचविणे, अशी कामे त्यांनी केली आहेत. याच सोबत 10 हून अधिक रुग्णांचे अंत्यसंस्कार केले असल्याने या तरुणांचा सत्कार करण्यात आला. सिद्धार्थ चौगुले, प्रविण कोरणे, आशिष कोचेरी, ज्योतिबा पाटील, प्रविण रेडेकर, आकाश भेकणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अंकुश केसरकर, महेश पावले, अतुल केसरकर, गजानन निलजकर, अमोल केसरकर, सुनिल मुरकुटे, सागर कडोलकर, गिरीश खन्नुकर, अमर खनगावकर, रोहित भादवणकर यांच्यासह इतर उपस्थित होते.