ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारत ब्राझीलला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. भारतात मागील 24 तासात 90 हजार 802 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1016 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 42 लाख 04 हजार 614 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 71 हजार 642 एवढी आहे.
सध्या देशात 8 लाख 82 हजार 542 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 32 लाख 50 हजार 429 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 4 कोटी 95 लाख 51 हजार 507 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 07 लाख 20 हजार 362 रुग्णांची तपासणी रविवारी एका दिवसात करण्यात आली.