प्रतिनिधी/ बेळगाव
चिकोडी तालुक्मयातील कोरोनाबाधित महिलेला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन येणारी रुग्णवाहिका उलटली. रविवारी सायंकाळी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बेन्नाळीजवळ ही घटना घडली असून या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत.
रात्री उशिरापर्यंत या घटनेची काकती पोलिसात नोंद झाली नव्हती. अंकली येथून कोरोनाबाधित महिलेला सिव्हिलला हलवताना हा अपघात घडला. रुग्णवाहिका चालक, परिचारिका व बाधित महिला जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अपघातानंतर काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना दुसऱया रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. केवळ सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. अपघातात जखमी झालेल्या कोरोनाबाधित महिलेलाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.