जिह्यात 101 रुग्ण तर तालुक्यात 59 नवे रुग्ण
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी तर तब्बल 101 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये तालुक्मयामधील 59 रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास पुन्हा मोठा धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे.
गेल्या पंधरा दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. हा संसर्ग झपाटय़ाने पसरत आहे. महाराष्ट्रामध्ये मोठय़ा प्रमाणात रुग्ण संख्या आढळत असताना आता बेळगाव जिह्यातही रुग्णांची संख्या वाढु लागली आहे. जिह्यामध्ये 101 रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य खातेही खडबडून जागे झाले आहे. इतके रुग्ण वाढुनही जनतेमध्ये मात्र भितीचे वातावरण दिसत नाही. त्यामुळे पुन्हा रुग्णांची संख्या वाढणार आहे.
मंगळवारी देसूर, गणेशपूर, लक्ष्मीनगर, सांबरा, अमाननगर, अनगोळ, अंजनेयनगर, भडकल गल्ली, चिदंबरनगर, गुरूप्रसाद कॉलनी, जाधवनगर, जयभवानीनगर, काकतीवेस, कंकणवाडी, लक्ष्मीटेक, महांतेशनगर, सदाशिवनगर, राणी चन्नम्मानगर, खासबाग, शहापूर, टिळकवाडी, वडगाव या परिसरासह इतर ठिकाणी पॉझिटिक्ह रुग्ण आढळले आहेत.
शहरामध्ये रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढ होत आहे. तरी देखील अजूनही याबाबत गांभीर्य दिसत नाही. यामुळे आरोग्य खात्यातून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तरी देखील सर्वसामान्य जनता मात्र या आजाराकडे दुर्लक्ष करताना दिसू लागली आहे. आढळलेल्या या रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.