ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्लाझ्मा बँक तयार केली जात आहे. अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये केली. ते म्हणाले, दिल्लीत प्लाझ्मा बँक सुरू केली जाणार आहे, जेणे करून कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी मदत मिळेल.
पुढे ते म्हणाले, या प्लाझ्मा थेरपीमुळे रुग्णांना मोठी मदत मिळणार आहे. पण या थेरपी साठी डोनर मिळवणे मोठे आव्हान आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केजरीवाल यांनी जनतेला केले आहे.
दिल्ली सरकारच्या प्लाझ्मा बँकच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे याचा फायदा सर्वांना मिळणार आहे. ही बँक आगामी दोन दिवसात सुरू होईल. पुढे ते म्हणाले, लोकनायक रूग्णालयात मागील दोन दिवसांमध्ये 35 लोकांना प्लाझ्मा दिला आहे. त्यातील 34 जणांची प्रकृती सुधारली आहे. तर एका खाजगी रुग्णालयात 49 प्लाझ्मा दिले गेले त्यातील 46 जणांची प्रकृती सुधारली आहे.
आम्ही दावा नाही करत की हे लोक प्लाझ्मा थेरपी मुळेच वाचले आहेत, कदाचित हे लोक असेच देखील बरे झाले असते पण गंभीर लोक प्लाझ्मा थेरपीमुळेच बरे झाले आहेत. त्यामुळे हिला संजीवनी नाही असेल पण एक आशा आहे की या थेरपी मुळे कोरोना चे रुग्ण बरे होऊ शकतात.
कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांना मी आवाहन करतो की, त्यांना लोकांचा जीव वाचवण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्लाझ्मा डोनेट करावा. तसेच यावेळी केजरीवाल यांनी मिडीयाला देखील प्लाझ्मा थेरपी चा प्रचार आणि प्रसार करा जेणे करुन लोकांचा जीव वाचवण्यासाठी मदत होईल, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.