हॉस्पिटल, कोविड सेंटरना ऑक्सिजन पुरवठा होणार
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बऱयाच रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही, अशा तक्रारी वाढल्यामुळे आता बेळगावातील हॉस्पिटल आणि कोविड सेंटरना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी मोबाईल ऑक्सिजन बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
या मोबाईल ऑक्सिजन बसमध्ये पाच ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यात आले आहेत. त्या ऑक्सिजनचा पुरवठा हॉस्पिटल्सना केला जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ऑक्सिजन सिलिंडर देण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.
सध्या बिम्स हॉस्पिटलमध्ये 400 ऑक्सिजन बेड आहेत. तर 300 बेड हे सामान्य आहेत. त्यांना हा ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. कोरोना महामारीचा वेग वाढला आहे. तो नियंत्रीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आता सरकारी वसतीगृहांतही कोविड केअर सेंटर उभारण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान कोरोना पॉझिटिक्ह रुग्णांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पण तरीही काही रुग्ण अजूनही काळजी घेत नाहीत. तेव्हा पॉझिटिक्ह रुग्णांना सक्तीने होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासह जेवण, नास्टा, पुरविण्यात येत आहे. तेव्हा त्या सेंटरमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांनी दाखल व्हावे आणि उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱयांनी केले आहे. या उद्घाटनानंतर जिल्हाधिकाऱयांनी चिकोडी तालुक्मयालाही भेट दिली. यावेळी जिल्हा पंचायतीचे सीईओ दर्शन एच. व्ही. हे त्यांच्या सोबत होते.
ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सचा पुरवठा करण्याची जबाबदारी आयएमएवर सोपविण्यात आली आहे. हिंडाल्कोने 25 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स मदत म्हणून दिले आहेत तर रेडक्रॉसने 2 कॉन्सट्रेटर्स दिले आहेत. आता त्यामधील कॉन्सट्रेटर्स सिव्हिल हॉस्पिटल तसेच कोविड सेंटर्सकडे देण्यात येणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. ऑक्सिजन मोबाईल बसच्या उद्घाटनावेळी जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच. व्ही., जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ, बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप, परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक मंजुनाथ मुंजी, ड्रग कंट्रोलर रघुराम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.