स्वतःच्या वाहनातून कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले
वार्ताहर/ अथणी
येथील शासकीय रुग्णालयाबाहेर श्वसनाचा त्रास होत असल्याने कोरोना रुग्ण उपचारासाठी तळमळत होता. याची दखल घेत तहसीलदार दुंडाप्पा कोमर आणि डीवायएसपी एस. व्ही. गिरीष यांनी स्वतःच्या वाहनातून कोरोना रुग्णाला नेताना कोविड सेंटरमध्ये दाखल करत उपचाराची सुविधा पुरविताना जीवदान दिले. शासकीय अधिकाऱयांची कार्यतप्तरता पाहून नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्मयातील एक रुग्ण उपचारासाठी नातेवाईकांसह अथणी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आला होता. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना त्वरित उपचाराची आवश्यकता होती. मात्र अथणी शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णासाठी बेड उपलब्ध नव्हता. त्यामुळे रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. यावेळी सदर रुग्णासह नातेवाईकांच्या डोळय़ात अश्रू आले होते. अशा स्थितीत ते तेथील उपस्थितांकडे उपचारासाठी मदत मागत होते. याचवेळी तहसीलदार दुंडाप्पा तोमर व डीवायएसपी गिरीष यांनी कार्यतत्परता दाखविताना आपल्या वाहनातून स्वतः घेऊन जात शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा वसतीगृहात कोविड सेंटर येथे दाखल केले. अधिकाऱयांनी दाखविलेल्या माणुसकीच्या हातभाराचे कौतुक होत आहे. दरम्यान अथणी शासकीय रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱयांनी केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.