बेळगाव तालुक्मयातील 127 जणांचा समावेश, 5 जण दगावले
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढती आहे. गुरुवारी आणखी 241 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एकूण बाधितांची संख्या 19 हजाराच्या घरात पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
बेळगाव शहर व उपनगरांतील 90 ग्रामीण भागातील 37 जण असे एकूण 127 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेळगाव शहर व तालुक्मयातील एका महिलेसह तिघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर खानापूर आणि मुडलगी येथील दोघां जणांचाही मृतात समावेश आहे.
कंग्राळी खुर्द, काकती, के. के. कोप्प, सांबरा, सुळेभांवी, मच्छे, महांतेशनगर, शेरी गल्ली, शिवापूर, रामतीर्थनगर, भाग्यनगर, अनगोळ, पोलीस हेडक्वॉर्टर्स, बसवाणकुडची, रेल्वे क्वॉर्टर्स, बिम्स क्वॉर्टर्स, टिळकवाडी, मुतगा, वंटमुरी, काळी आमराई, रामलिंगखिंड गल्ली, मजगाव, शिवबसवनगर, चिदंबरनगर, मृत्यूंजयनगर, गोडसेवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
खणगाव, समर्थनगर, गोवावेस, महाव्दार रोड, दरबार गल्ली, शांतीनगर-टिळकवाडी, विनायकनगर, कुवेंपूनगर, इंद्रप्रस्तनगर, कणबर्गी, जयनगर, तेग्गीनगल्ली-वडगाव, टिचर्स कॉलनी, अशोकनगर, बाची, नेहरुनगर, खंजर गल्ली, टिळकवाडी, शाहूनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
गुरुवारी सांबरा एटीएसमधील आणखी 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हलभांवी येथील आयटीबीपीच्या एका जवानालाही कोरोनाची लागण झाली असून देसूर येथील भारत पेट्रोलियममधील एकाचाही यामध्ये समावेश आहे. बिम्स्सह वेगवेगळय़ा इस्पितळातील कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी रात्री 9 पर्यंत सरकारी अहवाल जारी करण्यात आला नाही.