जिल्हय़ात नवे 141 रूग्ण, 15 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करताच पुन्हा एकदा रूग्णसंख्येतही वाढ झाली आह़े शनिवारी कोरोनाच्या 6 हजार 149 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये 141 जणांचे अहवाल कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आह़े तर 15 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े
जिल्हय़ात शनिवारी आरटीपीसीआरच्या 4 हजार 72 चाचण्यांपैकी 82 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 2 हजार 77 पैकी 59 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े यामध्ये मंडणगड-10, दापोली-12, खेड-17, गुहागर-11, चिपळूण-47, संगमेश्वर-14, रत्नागिरी-22, लांजा-6 तर राजापूर-2 असे तालुकानिहाय रूग्ण मिळून आले आहेत़ जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 75 हजार 574 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 2.01 इतका आह़े
उपचारात असलेल्या 15 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये दापोली-3, खेड-3 गुहागर-1, चिपळूण-3, रत्नागिरी-3, लांजा-1, राजापूर-1 अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े तर मागील 24 तासात बरे झालेल्या 78 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 72 हजार 154 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 95.48 इतके आह़े तर 1 हजार 38 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये केवळ 280 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़
एकूण रूग्ण -75574
नवे रूग्ण -141
एकूण मृत्यू -2299
मृत्यू – 15