‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी जनजागृती
नरंदे / प्रतिनिधी
कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी राज्य सरकारने ‘माझेकुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम घराघरातराबवायला सुरुवात केली असून नरंदेत या मोहिमेसाठी जोरदार जनजागृती सरू आहे. या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी व दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग वस्तूचे वाटप करण्यासाठी डॉ.विकास खरातसो, उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी यांनी भेट दिली.
या मोहिमेंतर्गत गावात परिपत्रके, रस्त्यारस्त्यावर मोठय़ा हाडग्जसह घोषवाक्ये, ग्रामपंचायत मधून आवाहन स्पिकर , जाहिरातींबरोबरच ग्रामपंचायतिच्या सोशल मीडियावर जोरदार जनजागृती केली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, ग्रामपंचायत प्रशासन
आणि कर्मचारी तसेच पोलीस, डॉक्टर, आरोग्यसेवक, कोरोना समिती आशा स्वयंसेविका, कर्मचारी धोका पत्करून आपापले कर्तव्य बजावत आहेत.कोरोना योद्धयांकडून अहोरात्र कर्तव्य पालन सुरू असतानाच कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. यात प्रत्येक घराघरात दोन वेळा तपासणी करून कोरोनाला आळा घातला जाणार आहे.
नागरिकांमध्ये जनजागृती साठी होर्डिंग्ज,माहितीपत्रक,डीजीटल फलक ,दंडात्मक कारवाई बाबत सुचना दिल्या व नो मास्क नो एन्ट्री ‘ करिता गावातील विविध दुकाने व व्यावसायिकांना प्रत्यक्ष भेटी देवुन ग्लोज व मास्क वापरणे बाबतचे महत्त्व सांगितले. विविध ठिकाणी डिजिटल होर्डिंग्स उभारली असून यात नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरण्याचे आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचे त्याचबरोबर घराबाहेर आणि घरात परतल्यानंतर वेळोवेळी हात धुवा, असे आवाहन करण्यात आले आहे.