ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
महत्त्वाच्या तारखा, दिनविशेष, अनेक दिग्गज, त्यांचे योगदाना सलाम करण्यासाठी गुगलकडून नेहमीच रंगीबेरंगी डूडल तयार केले जाते. मात्र, सध्या देशात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोरोना पासून बचाव करण्यासाठी गूगलने खास डूडल तयार केले आहे.
या डूडल मध्ये सुरक्षिततेसाठी उपाय सांगितले आहेत. या खास डूडल मध्ये गुगल नावाच्या प्रत्येक अक्षरातून लोकांना घरी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यामध्ये पुस्तक वाचणे, गिटार वाजवणे, व्यायाम करणे, मित्रांशी फोनवरून बोलणे याचा यात समावेश करण्यात आला आहे.
तसेच प्रत्येकाने घरात रहा आणि आपले आयुष्य वाचावा असा खास संदेश देणाऱ्या टिप्सही दिल्या आहेत. यांमध्ये आपले हात स्वच्छ धुवा. खोकताना, शिंकताना तोंडावर हात धरा. हात स्वच्छ नसेल तर तोंडाला, नाकाला, डोळ्यांना स्पर्श करू नका तसेच एकांतात रहा यासारख्या टीप्स दिल्या आहेत. व या टिप्सचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.