वृत्तसंस्था/ कोलंबो
कोरोना विषाणूचा फटका शेजारील श्रीलंकेलाही बसला असून आतापर्यंत तेथे अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. या परिस्थितीत लंकेतील प्रत्येक नागरिक आपल्या परीने मदतीसाठी पुढे येत आहेत. श्रीलंकन क्रिकेट मंडळानेही आपले सामाजिक कर्तव्य जपत 25 मिलियन लंकन डॉलरची मदत (10 कोटी रुपये) श्रीलंकन सरकारला केली आहे. लंकन क्रिकेट मंडळाच्या सदस्यांनी शनिवारी अध्यक्ष राजेपक्षे यांची भेट घेत त्यांच्याकडे हा निधी सुपुर्द केला. दरम्यान, लंकन क्रिकेट मंडळाने कोरोनाविरुद्ध लढय़ासाठी 10 कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती देशाचे अध्यक्ष राजेपक्षे यांनी ट्विट करत दिली आहे.