ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
जगभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव भारतात देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. आत्तापर्यंत पन्नास पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात लॉक डाऊन घोषित केला आहे. तसेच पंतप्रधान सहाय्यता निधी मध्ये मदत करण्याची विनंती केली आहे.
पंतप्रधानांच्या विनंतीला अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. आता टिक टॉकने देखील पुढाकार घेतला आहे. आमच्या कडून शंभर कोटींची मदत जाहीर करत असल्याची माहिती टिक टॉक ने आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, भारताला टिक टॉक कडून 100 कोटींचे मेडिकल ईक्विपमेंट देण्यात आले आहे. यामध्ये चार लाख प्रोटेक्टिव्ह सूट आणि दोन लाख मास्क चा समावेश आहे.
तसेच सध्या भारतात कठीण परिस्थितीत निर्माण झाली आहे. या परिस्थितीत आम्ही भारताच्या सोबत आहोत. असं ही टिकटॉक ने म्हटले आहे.