प्रतिनिधी/ सातारा
कोरोना लसिकरणाचा दुसरा टप्पा सातारा जिल्हय़ात नुकताच सुरू करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा प्ररिषद साताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांना लसिकरण करण्यात आले. त्यानंतर जिल्हय़ातील सर्व महसुल विभाग, पोलीस विभा व पंचायत राज व्यवस्था व नगरपालिका कर्मचारी (फ्रन्टलाईन वर्कर्स) यांना कोरोना लसिकरण करण्यात येणार आहे. त्याकरीता जिह्यातील शासकीय व खासगी असे एकुण 21 ठिकाणी लसिकरण केंद्र तयार करण्यात आली असून त्यामध्ये संबंधीत सर्व कर्मचाऱयांना लसिकरण करण्यात येणार आहे.
गेल्यावर्ष भरापासून जगभरासह भारतात मोठय़ा प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण आढळून येत असून त्यावर मोठय़ा प्रमाणावर उपययोजना केंद्र व राज्य शासना मार्फत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सातारा जिल्हा प्रशासना तर्फे ही मोठय़ा प्रमाणावर उपाय योजना करून या महामारीच्या साथीच्या नियंत्रण करण्याची जबाबदारी घेऊन काम करण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या उपाय योजनेचा भाग म्हणून कोरोना लसिकरण सुरू करण्यात आले असुन त्यानुसार सातारा जिल्ह्य़ाकरीता एकूण 53 हजार लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणा नुसार प्रथम 14405 शासकीय व खासगी आरोग्य कर्मचारी यांना कोरोना लसिकरा करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले की, कोरोना काळात काम केलेल्या सातारा जिल्हय़ातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी, महसुल विभाग, पोलिस विभाग पंचयत राज व्यवस्था व नगरपालीका कर्मचारी यांनी कोविड कालावधीत उत्कृष्ठ काम केले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्य़ातील आपण कोवीडचा प्रादुर्भाव रोखण्यास यशस्वी झालो. याचाच पुढचा टप्पा म्हणजे कोविड लसिकरण , आज मी ही लस घेतलेली असून ती पूर्ण पणे सुरक्षीत असून सर्व संबंधीतांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.