45 वर्षांवरील प्रत्येकाला देणार कोरोना लस
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
जगभरासह कोरोनाचा प्रसार वाढत आहे. देशभरात कोरोना लसीकरण केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार सुरु आहे. आता यात नवीन एक भर पडली आहे. केंद्र शासनाने एक नवीन घोषणा केली आहे. ज्याच्यामध्ये देशातील 45 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. हे लसीकरण एप्रिल महीन्याच्या सुरूवातीला सुरू करण्यात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, हे लसीकरण 1 एप्रिलपासून सुरु होत आहे, तरी 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकासाठी ही लस सुरू होईल. तरी सर्व पात्र नागरिकांनी त्वरित नोंदणी करुन लसीकरण करावे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र सरकारकडून नियम पाळण्याचे आवाहन जनतेला करण्यात येत आहे.