वार्ताहर / उचगांव
कोरोना विषाणूच्या विरोधात लढताना पोलिस कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. बंदोबस्ताचे काम करताना सर्वच प्रकारच्या लोकांशी पोलिसांचा संपर्क येत असल्याने त्यांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उषःदीप होमिओपॅथीचे डॉ. संदीप पाटील यांनी केले.
गांधीनगर ता. करवीर येथे पोलिस आणि पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरप्रसंगी ते बोलत होते. मिशन होमिओपॅथी आणि गांधीनगर पोलीस स्टेशनच्यावतीने पोलिस कर्मचारी, पत्रकार, सरपंच, पोलीस पाटील यांच्या आरोग्याची तपासणी करुन त्यांना औषधे देण्यात आली. यावेळी डॉ. श्रीकांत लंगडे, डॉ. तेजराज पाटील, डॉ. विरधवल मोरे, डॉ. पूनम पाटील, डॉ. हीना शेख, डॉ. सुप्रिया सरनाईक यांनी वैद्यकीय तपासणी केली. शेवटी आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांनी मानले.