ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीन सरकारला सर्वात आधी कोरोना व्हायरसबद्दल चेतावणी देणाऱया डॉक्टरचं निधन झालं आहे. ली वेनलियांग असे या डॉक्टरचे नाव आहे. ज्या विषाणूबाबत चेतावणी देण्याचा प्रयत्न केला त्याच डॉक्टरला या व्हायरसची लागण झाल्याने त्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला. ते 34 वर्षांचे होते.
दरम्यान, ली वेनलियांग यांनी चेतावणी दिल्यानंतरही सरकारने त्यांचा दावा फेटाळून लावला होता.
चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या माहितीनुसार, वेनलियांग यांचा मृत्यू कोरोना विषाणुमुळे झाला. ज्यावेळी वुहान शहरात कोरोना विषाणूची माहिती लपवण्याचा प्रयत्न करण्यात येते होता. त्यावेळी ली वेनलियांग यांनी रुग्लालयातून व्हिडीओ पोस्ट करत कोरोना विषाणूबाबत लोकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. याप्रकरणी चीनच्या स्थानिक आरोग्य विभागाने ली वेनलियांग यांची चौकशी करुन त्यांना नोटीस जारी केली होती. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचा आरोप केला होता.