ऑनलाईन टीम / बीजिंग :
कोरोना विषाणू हा मानवनिर्मित आहे. त्याचे माझ्याकडे सबळ पुरावे असून, ते मी लवकरच जगासमोर सादर करेन, असे चीनच्या महिला विषाणू शास्त्रज्ञ ली-मेंग यांनी म्हटले आहे.
ली-मेंग म्हणाल्या, कोरोना विषाणू हा वुहानच्या मांस बाजारातून आलेला नाही. तो मानवनिर्मित आहे. या विषाणूचा जिनोम सिक्वेन्स हा मानवी फिंगर प्रिंटसारखा आहे. त्यामुळे तो विषाणू मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होईल.
कोरोना विषाणू हा मानवनिर्मित असल्याचा मी चीन सरकारवर आरोप केल्यानंतर मला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर हँगकाँग सोडून मी अमेरिकेत स्थलांतरित झाले. चीन सरकारने माझा डेटा हॅक करून मला खोटं पडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. माझ्या सहकाऱ्यांना भडकावून माझ्याविरोधात अफवा पसरवण्यास सांगण्यात आले. मात्र, मी मागे हटणार नाही. लवकरच कोरोना विषाणू मानवनिर्मित असल्याचे मी सिद्ध करेन, असे ली-मेंग यांनी म्हटले आहे.