ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण देशावर ओढवलेल्या कारोना महामारीच्या संकटात काम करणाऱ्या योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सैन्याच्या तिन्ही दलांकडून आज अनोखी मानवंदना देण्यात आली.
वायुसेनेने सुखाई सारख्या लढाऊ विमानांमधून देशाच्या विविध भागातील कोरोना रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. दिल्लीतील पोलीस मेमोरियल मध्ये श्रद्धांजली अर्पण करून याची सुरुवात करण्यात आली. पोलिस कर्मचाऱ्यांना सन्मान करताना वायु सेनेकडून पोलीस वॉर मेमोरियल वर पुष्पवृष्टी केली गेली.
भारतीय वायू सेनेच्या विमानांनी कोरोना योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना जम्मू काश्मीर मधील डल लेकजवळ सकाळी फ्लायफास्ट केले. त्यानंतर दिल्लीतील राजपथ, राजस्थानमधील जलमहल, भोपाळ मधील बडा तलाव, महाराष्ट्रातील मरीन ड्राईव्ह, हैदराबाद मधील हुसेन सागर तलाव, कर्नाटक विधानसभा, कोईंम्बतुर च्या आकाशात फेऱ्या मारल्या.
तर समुद्रातून ही भारतीय नौदलाकडून या योद्ध्यांना सलामी दिली जाणार आहे. यासाठी 24 बंदरांवरील जहाजांवर विशेष रोषणाई केली जाणार आहे. यामध्ये गुजरात, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, गोवा, विशाखापट्टणम येथील बंदरांवर सायंकाळी साडेसात वाजता विद्युत रोषणाई केली जाईल. यावेळी ‘इंडिया सॅल्यूट कोरोना वॉरियर्स’ चे बॅनर्स जहाजावर लावले जातील. तर संध्याकाळी साडेसात वाजता सायरन वाजवून फायर फ्लेयर सोडले जातील .