मृताचा स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह
प्रतिनिधी/कोल्हापूर
सीपीआर कोरोना हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी पहाटे करवीर तालुक्यातील 35 वर्षीय तरूणाचा न्यूमोनियाने मृत्यू झाला. त्याचा स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली.
करवीर तालुक्यातील पुर्व भागातील तरूण सोमवारी पहाटे श्वसनाला त्रास झाल्याने दाखल झाला होता. शुक्रवारी पहाटे त्याचा कोरोना वॉर्डमध्ये मृत्यू झाला. त्याच्या फुस्फुसात संसर्ग झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.