ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला एक सूचना दिली आहे. यानुसार, आता एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही, याची तपासणी आता मोफत करण्यात यावी असे म्हटले आहे.
दरम्यान, याआधी केंद्र सरकारने 21 मार्चला खाजगी लॅबने कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी 4500 रुपयांपर्यंत फीस घ्यावी, असे म्हटले होते. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, अशाप्रकारचे तंत्र विकसित केले जावे, की एखाद्या व्यक्तीकडून अधिक फीस घेतली गेली असेल तर ती त्या व्यक्तीला सरकार परत करेल.
यावर केंद्राने म्हटले की, देशामध्ये 118 लॅब आहेत. यामध्ये दररोज 15000 टेस्ट केल्या जातात. मात्र या पुरेशा नसल्याने आता खाजगी प्रयोगशाळांना सुद्धा परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस संक्रमणाच्या चाचणीची फीस अधिक आहे त्यामुळे ही टेस्ट मोफत व्हावे अशी मागणी करणारी याचिका अॅड. शशांक देव सुधीर यनी केली होती.