प्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱयांना ‘मास्कने’ची बाधा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
कोरोना महामारीदरम्यान कोरियाई कंपन्यांनी ‘मास्कने एजेंशियल्स’ नावाने उत्पादने बाजारात आणली आहेत. जगभरात एक नवा शब्द ‘मास्कने’ प्रचलित होऊ लागला आहे. याचा अर्थ मास्क परिधान केल्याने चेहऱयावर येणाऱया पुटकुळय़ा किंवा जळजळ असा होतो. मास्कनेचा सर्वाधिक धोका आरोग्य कर्मचारी आणि अन्य कोरोनायोद्धय़ांना आहे. कारण हे सर्वजण घट्ट मास्क दीर्घकाळापर्यंत परिधान करत आहेत.
जर्नल ऑफ अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीमध्ये प्रसिद्ध संशोधनानुसार चीनच्या हुबेईमध्ये सुमारे 83 टक्के आरोग्य कर्मचारी चेहऱयाच्या त्वचेशी संबंधित समस्यांना तोंड देत आहेत. याचबरोबर सर्वसामान्य लोकांच्या चेहऱयावर पुटकुळय़ा उमटू लागल्या आहेत. आतापर्यंतच्या प्रॅक्टिसदरम्यान पहिल्यांदाच चेहऱयावरील पुटकुळय़ांच्या समस्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. मास्क त्वचेच्या जुन्या समस्या वाढवू शकतो किंवा नव्या समस्या निर्माण करू शकत असल्याने हे घडत आहे. तसेच उन्हाळा आणि घामामुळे स्थिती आणखीनच बिघडत असल्याचे मॅनहॅटन येथील डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर व्हिट्नी बोव यांनी सांगितले आहे.
मास्कनेचा उपचार कसा करणार?
मास्कनेची बाधा झाल्यास त्यावरील उपचार त्रास देणारा ठरू शकतो. चेहऱयाची जळजळ झाल्यावरही मास्क परिधान करावा लागणार आहे. सर्वसामान्य तारुण्यपिटिकांच्या तुलनेत मास्कनेसंबंधी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. हायपरपिगमेंटेशनयुक्त रुग्णांनी घरात वावरतानाही सनस्क्रीनचा वापर करावा. चेहऱयावरील पुटकुळय़ा अधिक वाटल्यास तेथे खाजवू नये. मास्क धुतल्यावर त्याच्या फॅब्रिकमुळे हे फोड येऊ शकतात, अशा स्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. पुटकुळय़ांमागे तणाव आणि अवेळी भोजनही कारण असू शकते. चॉकलेट आणि अन्य हाय ग्लायसेमिक फूड तसेच दुग्धोत्पादनेही कारणीभूत असल्याचे जामा डर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित एका मोठय़ा एपिडेमियोलॉजिकल अध्ययनात म्हटले गेले आहे.
योग्य मास्कची निवड करा
मास्कची सामग्री आणि सुरक्षेत कशाप्रकारचे संतुलन निर्माण करावे हे ठरवा. डर्मेटोलॉजिस्ट 100 टक्के कॉटन मास्क चांगला मानतात, या मास्कमुळे त्वचेला श्वास घेण्याची संधी मिळते. तापमान वाढल्यावर घामाचे प्रमाण अधिक होते, अशा स्थितीत मास्क स्वच्छ ठेवावा, असे टेंपल युनिव्हर्सिटीतील डॉक्टर कँड्रीस हीथ यांनी सांगितले आहे.
स्कीनकेयर’ कमी वापरा
अनेक जण सौंदर्यप्रसाधनांचा वापर अधिक करतात. परंतु मास्क परिधान करणे या उत्पादनांचा वापर कमी करण्यासाठी चांगले निमित्त ठरू शकते. सौंदर्यप्रसाधनांचा कमीत कमी वापर चांगला ठरणार आहे. मॉश्चेरायजरच्या वापरावर भर दिल्यास मास्क फ्रिक्शनपासून बचाव होणार असल्याचे डेल मेडिकल स्कुलमधील डॉक्टर एस. टायल हॉलमिग यांनी म्हटले आहे.
मेकअपशी ब्रेकअप
मेकअप कमी करण्याचा हा सर्वात चांगला काळ आहे. मेकअपची सवय जात नसल्यास डॉक्टर सनस्क्रीनसह टिंटेड मॉश्चेरायजरच्या वापराचा सल्ला देत आहेत. मास्कच्या आत घाम येत असल्यास तो भाग हटविल्यावर जेंटल क्लीन्जरने स्वच्छ करून घ्यावा. याचबरोबर मॉश्चेरायजरही वापरले जाऊ शकते असे डर्मेटोलॉजिस्ट शारी मार्चबॅन यांनी सुचविले आहे.