प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातून कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. रविवारी आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये बेळगाव जिल्हय़ातील आणखी चौघा जणांचा कोरोना रुग्णांत समावेश झालेला असून कुडची (ता. रायबाग) व हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) हे कोरोनाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला आहे.
रविवारी सकाळी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये राज्यातील एकूण 11 जणांमध्ये हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) येथील एक 38 वषीय युवक, कुडची (ता. रायबाग) येथील 19 वषीय तरुण, 55 वषीय इसम व 25 वषीय तरुण या चौघा जणांचा समावेश आहे. सायंकाळी जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये रविवारी एका दिवसात राज्यात 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे उघडकीस आले.
‘त्या’ चौघा जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू
केस क्रमांक 128 (हिरेबागेवाडी येथील तरुण) याच्या संपर्कातून त्याच गावातील 38 वषीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून कुडची येथील 41 वषीय महिलेच्या (केस क्र. 150) संपर्कातून उर्वरित तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. या सर्व चौघा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या रविवारी 14 वर
बेळगाव जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या रविवारी 14 वर पोहोचली असून या सर्व 14 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याची माहिती बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. संपर्कातून संसर्गाला सुरुवात झाली असून हा धोका वाढण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे.
कुडची येथील तीन महिलांसह चौघा जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. 5 एप्रिल रोजी आरोग्य विभागाने यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला होता. केस क्रमांक 50 मधील 41 वषीय महिला 13 ते 18 मार्च 2020 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या तबलिगी जमातच्या धर्मसभेत भाग घेऊन 20 मार्च रोजी ती आपल्या गावी परतली होती. तिला कोरोनाची लागण झाली असून तिच्या संपर्कातून तिच्या कुटुंबातील आणखी तिघा जणांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
हिरेबागेवाडी येथील 28 वषीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे 3 एप्रिल रोजी स्पष्ट झाले होते. याच दिवशी कॅम्प येथील एक तरुण व बेळगुंदी येथील एका वृद्धाचाही अहवाल पॉझिटिव्ह आले होते. केस क्रमांक 128 चा हा तरुणही 13 ते 18 मार्च 2020 पर्यंत झालेल्या नवी दिल्ली येथील मरकजमधून धर्मसभेत भाग घेऊन तो आपल्या गावी परतला होता. त्याच्या संपर्कातून त्याची आई, वडील व भावालाही कोरोनाची लागण झाली होती. आता त्याच्या 38 वषीय मित्राचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सिव्हिल हॉस्पिटल आवारात निर्जंतुकीकरण चेंबर
दरम्यान, सिव्हिल हॉस्पिटल आवारात निर्जंतुकीकरण चेंबर उभारण्यात आले आहेत. बुडाच्या पुढाकारातून विलगीकरण कक्षाबाहेर निर्जंतुकीकरण चेंबर बसविण्यात आले असून या कक्षात जाणाऱया प्रत्येकावर औषधांची फवारणी होते. शनिवारी सायंकाळपासून हे चेंबर कार्यरत झाले आहे. विलगीकरण कक्षात एकूण 14 जणांवर उपचार सुरू असल्यामुळे पोलिसांनी या परिसरातील लॉकडाऊन अधिक कडक केले असून या मार्गावरून येणारीजाणारी वाहने अडवून तपासणी करण्यात येत होती.
संशयितांवर व कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱया परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी व डॉक्टरांसमोर थुंकण्याचा प्रकार लक्षात घेऊन संशयितांना शहरातील वेगवेगळय़ा लॉजमध्ये हलविण्यात आले असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केवळ कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येत आहेत. सिव्हिलमधून पलायन करण्याचे प्रकारही वाढल्यामुळे प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
बॉक्स
224 जणांचे अहवाल निगेव्हिट
जिल्हा सर्वेक्षण विभागाने रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण जिल्हय़ातील 1636 जणांच्या आरोग्यावर आरोग्य विभागाने बारकाईने लक्ष ठेवले आहे. आतापर्यंत 335 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून यापैकी 224 जणांचे अहवाल निगेव्हिट तर 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला आणखी 77 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्हय़ातील 640 जणांनी चौदा दिवसांचा तर 709 जणांनी 28 दिवसांचा क्वारंटाईन अवधी पूर्ण केला असून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे.