शहरी क्षेत्रातील बेरोजगारी दर आता 309 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर देशभरातील बेरोजगारी दर 23.4 टक्के झाला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) च्या साप्ताहिक सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. 5 एप्रिल रोजी संपलेल्या आठवडय़ानंतर 6 एप्रिल रोजी नवी आकडेवारी सादर करण्यात आली आहे. सीएमआयईच्या अनुमानानुसार मार्चच्या मध्याला हा आकडा 8.4 टक्के होता आणि आता हे प्रमाण वाढून 23 टक्के झाले आहे.
भारतात साप्ताहिक किंवा मासिक आधारावर वेगाने बेरोजगारीची आकडेवारी जमविण्याचे कुठलेच अधिकृत किंवा विश्वासार्ह साधन नाही.