ऑनलाईन टीम / मालेगाव :
देशात कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. मालेगावातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
मालेगावातील एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मालेगावात कोरोना बाधितांची एकूण संख्या 116 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून मालेगाव डेंजर झोनकडे वाटचाल करत आहे. मालेगावात पहिले पाच रुग्ण आठ एप्रिल रोजी सापडले होते. आज 24 एप्रिल आहे. एवढ्या कमी दिवसात कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
प्रशासनाकडून सर्व नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.