कोलेस्ट्रॉल कमी करणाऱया औषधांमुळे रुग्ण होतो लवकर बरा
कोरोनाबाधितांच्या आजाराचा गंभीरपणा कमी करण्यास स्टॅटिन्स उपयुक्त ठरू शकतात. कोलेस्ट्रॉल कमी करणाऱया या औषधांचा किमान दोन नव्या अध्ययनांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिकन जर्नल ऑफ कार्डियोलॉजी (एजेसी) आणि द ईएमबीओ जर्नलमध्ये प्रसिद्ध संशोधनानुसार स्टॅटिन्समुळे आजार 50 टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. स्टॅटिन्स औषधे स्वस्त (5 ते 50 रुपये प्रति टॅबलेट) सहजपणे उपलब्ध आहेत.
रिकव्हरीही जलद
एजेसीमध्ये 15 सप्टेंबर रोजी प्रकाशित संशोधनात कोविड-19 च्या 170 रुग्णांचे विश्लेषण करण्यात आले आहे. संशोधनानुसार भरती होण्यापूर्वी स्टॅटिन्सच्या वापराने कोविडला गंभीर स्वरुप घेण्यापासून रोखण्यास 50 टक्क्यांपर्यंत मदत मिळाली आहे. स्टॅटिन्समुळे रिकव्हरीही जलद होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. कोलेस्ट्रॉल आणि लिपिड मेटाबॉलिज्ममध्ये सामील सीएच25एच जीनमध्ये अँटीकोरोना विषाणू क्रिया तयार झाली. त्याने विषाणूंना पेशींशी संलग्न होण्यापासून रोखल्याचे ईएमबीओच्या अध्ययनात आढळले आहे.
स्टॅटिन्स उपयुक्त
स्टॅटिन्सचे कार्य धमन्यांमधील कोलेस्ट्रॉल हटविणे आहे. आमच्या शरीराच्य पेशींच्या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल असते. स्टॅटिन्स या धमन्यांमधील कोलेस्ट्रॉल हटविण्यास मदत करू शकते, यातून विषाणूचे पेशींशी संलग्न होण्याचे प्रयत्न अपयशी ठरतात किंवा त्याचा प्रवेश बंद होतो. हे अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन आहे. बहुतांश हृदयविकार आणि मधुमेहाचे रुग्णही स्टॅटिन्स घेतात आणि संशोधनानुसार ही औषधे घेतल्याने संसर्ग गंभीर स्वरुप घेण्याची शक्यता कमी होत असल्याची माहिती फोर्टिस सी-डॉक हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अनूप मिश्रा यांनी दिली आहे. जर कुठल्याही स्वस्त किंवा सहजपणे उपलब्ध औषधाने रुग्णाचा मृत्यू रोखता येत असल्यास ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कोरोनाबाधितांना कार्डियोवस्कुलर आणि थ्रॉम्बाटिक आजारांचा धोका असतो. कोरोनाबाधितांना दिलासा मिळवून देणारे गुण स्टॅटिन्समध्ये असू शकतात, असे विधान मॅक्स साकेतमधील मेडिसीन डिपार्टमेंटचे सहाय्यक संचालक डॉ. रोमेल टिक्कू यांनी केले आहे.