प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी ;
जिल्हय़ातील आणखी दहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हय़ात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 111 झाली आहे. तर आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 158 वर गेली आहे. मात्र सद्यस्थितीत 42 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
जिल्हय़ात बुधवारी रात्री उशिरा आणखी दोन व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्मयातील मळगाव येथील एक आणि कणकवली तालुक्मयातील तरंदळे येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 158 झाली आहे. यातील 111 रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त झाले आहेत. तर चौघांचा मृत्यू आणि एक रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेला आहे. त्यामुळे जिल्हय़ात सध्या 42 सक्रीय रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
जिल्हय़ात येणाऱयांची संख्या एक लाखावर
पुणे, मुंबई व इतर जिल्हे आणि राज्यातून येणाऱया नागरिकांची संख्या थांबलेलीच नसून दररोज एक ते दोन हजार नागरिक येतच आहेत. त्यामुळे 2 मे पासून आतापर्यंत 1 लाख 1 हजार 51 लोक जिल्हय़ात आलेले आहेत.