जिल्हय़ात अजूनही 15 हजार व्यक्ती क्वारंटाईनमध्ये : 183 रुग्ण कोरोना मुक्त
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोनाचे आणखी चार रुग्ण बरे झाल्याने मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 183 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत कोरोना सक्रिय 56 आणि संशयित 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याशिवाय जिल्हय़ात अजूनही 15 हजार 154 व्यक्ती विविध ठिकाणी क्वारंटाईन आहेत. नव्याने नाटळ येथे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी येथे दिली.
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 245 वर पोहोचली आहे. 183 रुग्ण बरे झाले आहेत. पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण मुंबईला गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोना सक्रिय 56 रुग्ण आहेत. शासकीय, संस्थात्मक, गाव पातळीवर अलगीकरण आणि नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणामध्ये 15 हजार 154 रुग्ण आहेत. संशयित 23 रुग्ण आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
नाटळ येथे नवीन कंटेनमेंट झोन
कणकवली तालुक्मयातील नाटळ-चव्हाणवाडी येथील 100 मी. परिसरातील 12 घरे, 10 कुटंबे, 49 लोकसंख्या असणारा सर्व परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेनमेंट झोनमध्ये 19 जुलै 2020 रोजी रात्री 12 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱयाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 4199
अहवाल प्राप्त झालेले नमुने 4139
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 245
निगेटिव्ह आलेले नमुने 3894
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 60
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 56
अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 1
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 183
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 79
मंगळवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 2472
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 15157
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 62
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12583
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 2509
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 123115