बरे होण्याचे प्रमाण 85.79 टक्के, शनिवारी 39 बळी, 1647 बाधित
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात शनिवारी कोरोनाचे 1647 बाधित सापडले तर 39 जणांचे बळी गेले आहेत. सकारात्मक रुग्णसंख्येत बऱयाचअंशी घट झाली असून शनिवारी ती संख्या 18243 वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक असून 24 तासात 2693 जण बरे झाले आहेत.
24 तासात दगावलेल्या 39 रुग्णांमधील सर्वाधिक 19 जणांचे बळी गोमेकॉत गेले आहेत. तर 15 जण दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दगावले आहेत. त्याशिवाय धारबांदोडा आरोग्य केंद्रात 2 आणि दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात 3 जणांचे मृत्यू झाले आहेत. राज्यातील आतापर्यंतच्या बळींची संख्या 2341 वर पोहोचली आहे तर आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 144839 वर पोहोचली आहे. त्यातील एकूण 124255 रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 85.79 टक्के आहे. 24 तासात 196 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 1451 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
केवळ मडगावातच चारअंकी संख्येने रुग्ण
शनिवारी केवळ मडगाव केंद्र वगळता अन्य सर्व केंद्रांमधील रुग्णसंख्या तीन अंकी संख्येवर आली आहे. मडगावात सध्या 1849 रुग्ण आहेत. त्याखालोखाल पणजी केंद्रात 997, चिंबल केंद्रात 953, फोंडा केंद्रात 924 रुग्ण आहेत. राज्यातील 33 केंद्रांपैकी सर्वात कमी 136 रुग्ण मये केंद्रात आहेत.
केंद्रवार सक्रिय रुग्णसंख्या
डिचोली 423, सांखळी 577, पेडणे 699, वाळपई 438, म्हापसा 501, पणजी 997, हळदोणा 269, बेतकी 598, कांदोळी 814, कासारवर्णे 142, कोलवाळ 304, खोर्ली 532, चिंबल 953, शिवोली 568, पर्वरी 699, मये 136, कुडचडे 631, काणकोण 355, मडगाव 1849, वास्को 670, बाळ्ळी 315, कासावली 839, चिंचिणी 226, कुठ्ठाळी 751, कुडतरी 598, लोटली 497, मडकई 299, केपे 399, सांगे 260, शिरोडा 297, धारबांदोडा 395, फोंडा 924 व नावेलीत 283 रुग्ण आहेत. त्याशिवाय रेल्वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले 5 बाधित सापडले आहेत.
22 मे पर्यंतचे एकूण रुग्ण 144839
22 मे पर्यंत बरे झालेले रुग्ण 124255
22 मे पर्यंतचे सक्रिय रुग्ण 18243
22 मे रोजीचे नवीन रुग्ण 1647
22 मे रोजी बरे झालेले रुग्ण 2693
22 मे रोजीचे बळी 39
वर्षभरातील एकूण बळी 2341