आडेली / वार्ताहर:-
आडेली कोरोना ग्रामनियंत्रण समिती व आडेली प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य विभाग यांच्या वतीने शनिवारी सकाळी ते दुपारच्या सत्रात वजराट तिठा येथे मुख्य रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांची रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट मोहीम राबविण्यात आली. दरम्यान याबाबत आडेली ग्रामपंचायत सदस्य विष्णू उर्फ तात्या कोंडसकर यांनी समिती सचिव यांचा मनमानी कारभार सुरु असून कोरोना नियंत्रण समिती सदस्यांना विश्वासात न घेता ही मोहिम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.तसेच मोहिमेत रस्त्यावर अर्धवट पीपीई किट घालून संबंधित आरोग्य विभागामार्फत काम सुरु होते, असेही त्यांनी सांगितले.
तसेच पावसाळी हंगाम सुरु होणार असल्याने शेतकरी वर्ग भात बियाणे, खते यांच्या खरेदीसाठी बाहेर पडत आहे. अशा परिस्थितीत घरात बसून बियाणे,खते घरपोच मिळणार आहेत काय? अशा परिस्थितीत कोरोना समिती सदस्यांना विश्वासात न घेता सचिव यांच्यामार्फत मनमानी कारभार सुरु आहे. याबाबत येथील शेतकऱ्यांच्या व गोरगरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी विष्णू भिकाजी उर्फ तात्या कोंडसकर यांनी केली आहे.