प्रतिनिधी / पणजी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य संचालनालयाने 75 मल्टिटास्कींग स्टाफची कंत्राटी पद्धतीवर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड इस्पितळात काम करण्यासाठी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ही भरती केली जाणार आहे.
कोविड इस्पितळ, कोविड केअर सेंटर आणि स्वॅब घेण्याच्या कामी या स्टाफला सेवा द्यावी लागणार आहे. या स्टाफला प्रति महिना 18,000 रुपये वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी 27 जुलै रोजी सकाळी 10 ते 12.30 या वेळेत आरोग्य संचालनालय कांपाल पणजी येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत. 18 ते 45 वयोगटातील व दहावी किंवा आयटीआय कोर्स केलेले उमेदवार यासाठी पात्र ठरतील. त्याचबरोबर 15 वर्षाचा रहिवाशी दाखला व कोकणीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.