जेएनएमसीच्या कम्युनिटी मेडिसीन विभागातर्फे ‘वाढते सांसर्गिक आजार : पुढे काय’? विषयावर वेबीनार
प्रतिनिधी / बेळगाव
जेएनएमसीच्या कम्युनिटी मेडिसीन विभागातर्फे दि. 19 डिसेंबर रोजी ‘वाढते सांसर्गिक आजार : पुढे काय?’ या विषयावर वेबीनार घेण्यात आले. प्रारंभी आयोजन प्रमुख प्रा. डॉ. शिवस्वामी यांनी स्वागत करून वेबीनारचा उद्देश स्पष्ट केला. कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांनी वेबीनारचे उद्घाटन केले.
यावेळी ते म्हणाले, अलीकडच्या काळात डेंग्यू, निपाह, कोविड-19 अशा संसर्गिक रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे.
प्राचार्या डॉ. निरंजना महांतशेट्टी यांनी कोविड-19 ने आपल्याला धडा शिकविला आहे. एक विषाणू संपूर्ण मानव समुहाला धोक्मयात आणू शकतो. त्यामुळे आपण काळजी घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत संपूर्ण जगातून कोरोना हद्दपार होत नाही तोपर्यंत मास्क वापरणे आवश्यक आहे, असे सांगितले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. आर. एस. मुधोळ, डॉ. विश्वनाथ पट्टणशेट्टी उपस्थित होते. 11 राज्यांतील 700 हून अधिक जणांनी या वेबीनारमध्ये भाग घेतला. यामध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विभागीय संचालक डॉ. रविकुमार, डॉ. सुधीर प्रभू, डॉ. प्रवीण जी. एस., डॉ. शामण्णा, डॉ. एडमंड फर्नांडिस यांनी मार्गदर्शन केले. डॉ. ख्रिस्टीना व डॉ. वर्षा यांनी सूत्रसंचालन केले. आयोजन सचिव डॉ. अविनाश कवी यांनी आभार मानले.