बरे होण्याचे प्रमाण 96.52 टक्के
प्रतिनिधी /पणजी
राज्यात कोरोनामुळे शुक्रवारी 5 जणांचे बळी गेले असून 222 बाधित सापडले आहेत. त्याचबरोबर 277 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 96.56 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात सध्या 2667 सक्रिय रुग्ण आहेत.
शुक्रवारी 3206 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 222 बाधित सापडले. त्यापैकी 22 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 200 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले. त्याचबरोबर 40 जणांना गोमेकॉतून घरी पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत वर्षभरातील एकूण बाधितसंख्या 165648 वर पोहोचली आाहे तर एकूण 159954 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण मृतसंख्या 3027 वर पोहोचली आहे.
शुक्रवारी नोंद झालेल्या 5 बळींमध्ये तिघे गोमेकॉत, तर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृत्यू झालेल्या दोघांचा समावेश आहे. या मृतांमध्ये सर्वजण 34 ते 87 वर्षे वयोगटातील आहेत. त्यात 4 पुरुष व 1 महिला रुग्णाचा समावेश आहे.
फोंडय़ात 210 रुग्ण
राज्यातील 33 पैकी फोंडा केंद्रात शुक्रवारी सर्वाधिक 210 रुग्ण होते. त्या खालोखाल मडगावात 175, काणकोणात 141, कांदोळीत 137, सांखळीत 135, पणजीत 125, कुडचडेत 103 व पर्वरीत 101 रुग्ण आहेत. अन्य सर्व केंद्रात प्रत्येकी 100 पेक्षा कमी रुग्ण आहेत. सर्वात कमी 18 रुग्ण कासारवर्णे केंद्रात आहेत.