उंब्रज/प्रतिनिधी
आशियाई महामार्गावर कोर्टी ता. कराड गावच्या हद्दीत सातारा ते कराड लेन वर रस्ताकडेला पार्किंग केलेल्या ट्रकवर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा कार धडकून झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर दोन जण गंभीर, दोन किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधून सहाजण प्रवास करत होते. गुरुवारी सकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. सदर अपघाताचा पंचनामा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अपघातातील जखमी व मृतांची नावे समजू शकली नाहीत.