ऑनलाईन टीम / बोगोटा :
कोलंबियात आतापर्यंत 20 लाख 02 हजार 969 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 18 लाख 22 हजार 309 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.
वर्ल्डोमीटरनुसार, कोलंबियात शनिवारी 15 हजार 591 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 396 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 लाख 29 हजार 678 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 2482 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 50 हजार 982 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत कोलंबियाचा जगात अकरावा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 95 लाख 75 हजार 784 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.