वृत्तसंस्था/ हैदराबाद
येथील गच्चीबोली इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या प्राईम व्हॉलीबॉल लीग स्पर्धेचे अजिंक्यपद कोलकाता थंडरबोल्टस् संघाने पटकाविताना अंतिम सामन्यात अहमदाबाद डिफेंडर्सचा 3-0 असा पराभव केला. या अंतिम लढतीत कोलकाता संघाने अहमदाबाद डिफेंडर्सचा 15-13, 15-10, 15-12 अशा सेट्समध्ये पराभव केला. विजेत्या कोलकाता संघातील विनितकुमारची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. या सामन्यात कोलकाताचा कर्णधार ए. राय आणि विनितकुमार यांची कामगिरी दर्जेदार झाली. या स्पर्धेत विनितकुमारची सर्वांत महत्त्वाचा व्हॉलीबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली. हैदराबाद ब्लॅक हॉक्सच्या गुरू प्रशांतची सर्वोत्तम इमर्जिंग खेळाडू म्हणून निवड केली.