ओटवणे / प्रतिनिधी-
कोलगांव ग्रामपंचायतीच्या पाटीदार समाज हाँल येथील ३० बेडच्या सुसज्ज विलगीकरण कक्षाला जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी गुरुवारी रात्री भेट दिली. यावेळी त्यांनी या गावातील कंटेनमेंट झोनधील ठाकुरवाडी आणि कुंभयाळवाडीला भेट देऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोलगाव ग्रामपंचायतीच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे कौतुक केले.
यावेळी सावंतवाडी पोलिस निरीक्षक हिंदळेकर, उपनिरीक्षक श्री यशवंते, सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, ग्रामपंचायत सदस्य संदीप हळदणकर, राजा चव्हाण, तलाठी श्री घुणात, पोलिस पाटील सूर्यकांत सावंत आदी उपस्थित होते. या विलगीकरण कक्षात राहणाऱ्या प्रत्येक रुग्णांची सर्व व्यवस्था ग्रामपंचायत आणि भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्यावतीने करण्यात येणार असून रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दखल घेतली जाणार असल्याचे सरपंच संतोष राऊळ यांनी सांगितले.