मुंबई : कोलगेट-पामोलिव या भारतातील ओरल केअर बाजारपेठेतील आघाडीच्या कंपनीने शाश्वत व अधिक निरोगी भविष्यकाळासाठी भारतात रिसायकल करता येण्याजोग्या टूथपेस्ट टय़ुब्ज आणल्या आहेत.
कोलगेटने हा उपक्रम ईपीएल लिमिटेडच्या (पूर्वीचे नाव एसेल प्रोपॅक लिमिटेड) सहयोगाने सुरू केला असून, आपल्या कोलगेट वेदशक्ती टूथपेस्टसाठी व कोलगेट ऍक्टिव सॉल्ट श्रेणीसाठी रिसायकल करता येण्याजोग्या टय़ुब्जचे उत्पादनही सुरू केले आहे.
ओरल केअरमध्ये सुधारणा करण्यासोबतच पर्यावरणावरील भार कमी करण्यासाठी जागतिक दर्जाच्या शाश्वत नवोन्मेषांची मुहूर्तमेढ या ब्रॅण्डने रोवली आहे. जगाला रिसायकल करता येण्याजोग्या टूथपेस्ट टय़ूबची ओळख करून देणारी कोलगेट-पामोलिव ही पहिली कंपनी होय. कंपनीने आपले हे तंत्रज्ञान सर्व उद्योगक्षेत्राला दिले आहे, जेणेकरून पर्यावरणपूरक व अत्यंत अत्यावश्यक अशा चक्रीय अर्थकारणाकडे सर्वांना स्थित्यंतर करता येईल.